“बावनकुळेंकडून पवारांच्या आमदाराला मान; उद्घाटनाची चर्चा रंगली”

“बावनकुळेंकडून पवारांच्या आमदाराला मान; उद्घाटनाची चर्चा रंगली”

सोलापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील करमाळा येथे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्घाटन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, बावनकुळे यांनी आग्रह करत त्यांना रेबिन कापायला लावली, तर त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुनही त्यांनी फोटो शेअर केले आहेत 

करमाळयातील नूतन सह दुय्यम निबंधक कार्यालयात उद्घघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क शरद पवार गटाचे आमदारनारायण पाटील यांना कार्यालयाचे उद्घाटन करायला लावले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, रश्मी बागल, गणेश चिवटे उपस्थित होते.तसेच, करमाळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळूचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना घरकुल योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी महसूल मंत्र्‍यांनी म्हटले. 

राज्यातील सर्वच खाती महत्त्वाची असली तरी अनादी कालापासून दोन विभाग कायमच जास्त महत्त्वाचे राहिले आहे. एक गृह विभाग जो तुमच्या जीविताचे रक्षण करतो आणि दुसरा महसूल विभाग जो तुमच्या मालमत्तेचे रक्षण करतो. मंत्रिमंडळातील इतर विभाग ही महत्त्वाचे पण त्यातल्या त्यात हे दोन विभाग सर्वात महत्त्वाचे असतात अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत भाजपकडे सर्वात महत्त्वाचे विभाग असल्याचे संकेत बावनकुळे यांनी यावेळी दिले. मात्र, याचा चुकीचा अर्थ इतरांनी घेऊ नये अशी पुष्टी ही महसूलमंत्र्यांनी जोडत महायुतीतील सहकाऱ्यांसाठी आपल्या वक्तव्याची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.