रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे यांची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या "संचालक" पदी बिनविरोध निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे नेतृत्व करणारी शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन, कोल्हापूर ची सन 2025 - 2030 या कालावधीकरीताची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. तीमध्ये येथील राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को - ऑप बँक लि., कोल्हापूर या बँकेचे ज्येष्ठ संचालक रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे यांची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन, कोल्हापूर येथे " संचालक " पदी बिनविरोध निवड झाली.
रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे यांनी दि महाराष्ट्र एम्प्लॉईज बँक्स को - ऑप. असोसिएशन लि. मुंबई येथे संचालक पद भूषविले असून ते गेली 30 वर्षे सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विविध संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली असून सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. याकामी राजर्षि शाहू गव्हर्मेंट सव्र्व्हटस को - ऑप. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन, कोल्हापूर चे अध्यक्ष निपुण कोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.