रविकांत अडसुळ यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

रविकांत अडसुळ यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून रविकांत आडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची बदली सांगली महापालिकेत करण्यात आली असून, त्यांच्या जागी आडसूळ यांनी आज (गुरुवारी ) अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. 

रविकांत आडसूळ हे याआधी २०२१ मध्ये कोल्हापूर महापालिकेत उपायुक्तपदावर रुजू झाले होते. त्यांनी तीन वर्षे उपायुक्त म्हणून काम पाहिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर त्यांची सांगली महापालिकेत बदली झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे.

सध्या कोल्हापूर महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. यापैकी एका पदावर नुकतीच शिल्पा दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली तर दुसऱ्या पदावर रविकांत आडसूळ यांनी आजपासून पदभार स्वीकारला आहे.