रश्मिका मंदानाच्या कुंडलीतील दोष तिच्यासाठी दुर्भाग्य तर विजय देवरकोंडासाठी ठरतोय लाभदायक?

रश्मिका मंदानाच्या कुंडलीतील दोष तिच्यासाठी दुर्भाग्य तर विजय देवरकोंडासाठी ठरतोय लाभदायक?

मुंबई - सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या संभाव्य लग्नाबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्यातील एका ज्योतिषदृष्ट्या दोषामुळे तिचं पहिलं नातं मोडलं, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, हाच दोष विजयसाठी शुभ फलदायी ठरत असल्याचं मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे. 

रश्मिका मंदाना हिने कोणत्याही गॉडफादरशिवाय, स्वतः च्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. आज ती टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असून, एका चित्रपटासाठी ती तब्बल ६ ते ७ कोटी रुपये मानधन घेते. तिच्या सौंदर्य, अभिनय आणि मेहनतीसोबतच कुंडलीतील काही विशेष योग तिच्या यशामागे कारणीभूत ठरले आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, रश्मिकाच्या कुंडलीत काही बलवान योग आहेत, जे तिला संकटांवर मात करण्याची ताकद देतात. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात ‘षडाष्टक दोष’ आढळल्यामुळे, तिचं पहिलं नातं टिकू शकलं नाही.

कधी काळी रश्मिका आणि कन्नड अभिनेता रक्षित शेट्टी हे लग्नाच्या उंबरठ्यावर होते. पण त्यांच्या कुंडलीतील षडाष्टक दोषामुळे त्यांचं नातं तुटलं. हा दोष चंद्र राशीवर आधारित असून, दोन राशी सहाव्या किंवा आठव्या स्थानावर असतील तर तो दोष निर्माण होतो. अशा वेळी नात्यात गैरसमज, तणाव आणि संघर्ष वाढू शकतात. या ब्रेकअपनंतर रश्मिकाने आपली कुंडली सुधारण्यासाठी विशेष पूजा, प्रार्थना केल्या. त्यात राज्य श्यामला पूजा, भागलमुखी पूजा आणि तारा पूजेचा समावेश होता. या उपायांमुळे तिचे ग्रह बळकट झाले आणि ती देशभरातील चाहत्यांची ‘नॅशनल क्रश’ बनली.

आता विजय देवरकोंडासोबत तिचं नाव जोडलं जात असून, दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विजयच्या कुंडलीत शुक्र ग्रह थोडा दुर्बल असल्यामुळे वैवाहिक आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र, रश्मिकाचे बळकट ग्रह त्याच्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात. ज्योतिषांच्या मते, रश्मिकाच्या प्रभावशाली कुंडलीमुळे विजयच्या दोषांचा प्रभाव कमी होईल. परिणामी, त्यांचं वैवाहिक आयुष्य यशस्वी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.