'मोहिनी'समोर येणार जन्मदात्याचा क्रूर चेहरा?

'मोहिनी'समोर येणार जन्मदात्याचा क्रूर चेहरा?

  मुंबई (प्रतिनिधी) : 'मोहिनी' मालिकेत  आता कथानक एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. अनेक योगायोग, संघर्ष आणि भावनिक वळणांनंतर अखेर अमरापूरमध्ये  मोहिनी आणि प्रतापराव  पहिल्यांदाच समोरासमोर येतात. मालिकेत आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या ज्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सेटवरच जन्मलेली, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना चुकून हिरोईन समजली गेलेली मोहिनी, तिच्या स्मार्टनेसने सतत परिस्थिती हाताळताना दिसते. आरकेसोबतचा तिचा डान्स, त्याच्या रागावर तिने दिलेलं उत्तर, त्याच्या मेकअपचं केलेलं कौतुक या सगळ्यांतून दोघांमधील नात्याला एक वेगळीच दिशा मिळते. पण आता बाप लेकीचा सामना झाल्यावर काय घडणार? 

मोहिनीसमोर तिच्या खऱ्या बापाचा क्रूर चेहरा समोर येणार का ? मोहिनी मालिकेत प्रतापरावांची भूमिका मराठी सिनेसृष्टीतील आणि सैराट मधून ज्यांना लोकप्रियता मिळाली असे सुरेश विश्वकर्मा साकारत आहेत.  

दरम्यान, अमरापूरच्या आऊटडोअर शूटसाठी निघालेल्या युनिटमध्ये ड्रायव्हर अचानक गायब झाल्यावर मोहिनीने बस चालवून सगळ्यांना सुरक्षित पोहोचवणं हा प्रसंग तिच्या धाडसाची झलक दाखवतो. अमरापूरमध्ये मात्र मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रतापराव मोहिनीच्या अंगावरील जन्मखुण पाहून चकित होणार का ? त्यांना  ती जन्मखुण दिसेल का ? महेंद्रला तिच्या जन्मखुणेमुळे सत्याची चाहूल लागेल का?  दुसरीकडे, प्रतापराव आणि RK यांच्यात तणाव निर्माण होताना दिसणार आहे. कारण प्रतापरावांनी दिलेल्या श्राद्धाच्या जेवणाच्या आमंत्रणाला आरके ठाम नकार देतो. दुसरीकडे, मोहिनीला महेंद्रच्या आयुष्यातील कुठलं गुपित समजणार? आणि ती शालिनीला ते सांगणार का? आणि त्यामुळे घरात मोठा संघर्ष उभा राहणार का? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

भूतकाळातील धक्कादायक सत्य, शालिनीची पळापळ आणि प्रतापरावांचा क्रूर चेहरा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उभा राहतो, मोहिनीसमोर तिच्या जन्मदात्याचा खरा चेहरा उघड होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.