राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; २२ ऑगस्टला शाहू स्मारक येथे सोहळा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर यांच्या वतीने ‘पद्मराजे पारितोषिक वितरण’, ‘सेवानिवृत्त सभासद सत्कार समारोह’, ‘मोफत आरोग्य तपासणी शिबीर’, ‘ग्राहक मेळावा’ तसेच ‘बँकेच्या मोबाईल ॲप’चा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हा संयुक्त कार्यक्रम शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी वसंत हंकारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी अजय पवार हे भूषवणार आहेत.
या विविध उपक्रमांचा व मोबाईल ॲपच्या शुभारंभाचा लाभ सर्व सभासदांनी व ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.




