विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे गणेशवाडीच्या शेतकऱ्यांचा मृत्यू.
करवीर (प्रतिनिधी): गणेशवाडी ( ता. करवीर ) येथील शेतकरी आकाराम नानासो माने ( वय ६५ ) हे शेतात औषध फवारणी साठी गेले असता विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ते बीडशेड येथील गणेश तलाव परिसरातील शेतात उसावर औषध फवारणी साठी चार वाजण्याच्या सुमारास गेले होते. पहिला पंप संपून दुसरा भरत असताना तोल जावून विहिरीत पडले. हाताला आधार न मिळाल्यामुळे व निर्मनुष परिसर असल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही. बराच वेळ घरी न आल्यामुळे शोधाशोध केली असता. विहिरीच्या काठावर चप्पल, फवारणीचा पंप, बादली आढळून आली. मृतदेह बाहेर काढून सीपीआर मध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.




