कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह-२०२६' मोठ्या उत्साहात
कोल्हापूर/ प्रतिनिधी :कोल्हापूर: येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित 'मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह-२०२६' मध्ये महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना नामवंत औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. या ड्राईव्हसाठी विविध महाविद्यालयांतील ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी १६३ जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.

अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फायझर, ग्लेनमार्क, झायडस फार्मा, एमबी केमिकल्स आणि ग्रुप फार्मास्युटिकल्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स आणि मार्केटिंग विभागात पुणे व गोवा येथे कामाची संधी मिळाली आहे. या भरती प्रक्रियेत इंडोको, सेंचॉर, एफडीसी या कंपन्यांनीही सहभाग घेतला होता.
या यशस्वी उपक्रमासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्लेसमेंट विभागप्रमुख आशुतोष कांबळे यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली, तर कु. वैष्णवी कौलगे, डॉ. सोनाली दिवटे आणि डॉ. अभिनंदन पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.




