कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील बिनविरोध

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील बिनविरोध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. बाजीराव पाटील यांची बुधवारी (दि. ८ जुलै २०२६) बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचे अधीन असलेले साहाय्यक निबंधक  डी. यु. पाटील हे होते.

चेअरमन पदासाठी बाजीराव पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सूचक  संजय शिंदे यांनी मांडला, तर  जयकुमार रेळेकर यांनी त्याला अनुमोदन दिले.

निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन बाजीराव पाटील म्हणाले, "कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी ही सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ असून तिने आपल्या उल्लेखनीय कारभाराने नावलौकिक मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने नेहमीच कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक प्रगतीसाठी मोठा हातभार लावला आहे. संस्थेने आर्थिक क्षेत्रात घेतलेली गरुडझेप कौतुकास्पद असून, सभासदांच्या हिताचे काम करण्यासाठी आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबद्ध आहोत." तसेच, भविष्यात संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार, सर्व संचालकांच्या सहकार्याने पारदर्शक आणि काटकसरीने चालवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या निवड प्रसंगी व्हा. चेअरमन जयकुमार रेळेकर, तसेच संचालक संदीप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र बसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, सरदार विंडे, सरोजनी कोरी, सोनाली गुरव आणि तज्ञ संचालक प्रविणकुमार पाटील, काकासाहेब पाटील उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, एम. एम. पाटील, के. आर. किरुलकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट आणि कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.