शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या नव्या संधी निर्माण

शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या नव्या संधी निर्माण

यड्राव (प्रतिनिधी) : एआयमुळे नोकऱ्या कमी होणार नसून सॅप व एआय या दोन्ही कौशल्यांचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. तसेच सॅपमधील विविध तांत्रिक व व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये मोठी करिअर क्षमता असून विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकण्याची जिज्ञासा कायम ठेवावे. ह्या कौशल्यामुळे टेक महिंद्रासह जगभरातील कंपन्यामध्ये करिअरला वाव मिळेल. असे प्रतिपादन टेक महिन्द्राचे प्रिन्सिपॉल अर्किटेक्ट हेमांग जाधव यांनी केले.

ते शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये टेक महिन्द्रा कंपनीच्या डाटा सायन्स अॅन्ड सॅप एबीएपी ह्या सेंटर ऑफ एक्सलंन्स लॅबच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. संस्थेच एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी अनिल बागणे म्हणाले, महाविद्यालयाने टेक महिंद्राच्या सहाय्याने सुरू केलेल्या इनोव्हेशन सेंटरमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामधून प्रकल्प, इंटर्नशिप, गेस्ट लेक्चर्स, तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकरीची संधी  मिळेल. या संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

यावेळी टेक महिंद्राचे प्रिन्सिपॉल अर्किटेक्ट सोल्युशन राहूल खटावकर यांनी सॅप क्षेत्रात प्रोग्रामिंगसह मटेरियल मॅनेजमेंट, फायनान्स, प्रॉडक्शन प्लॅनिंग, एचआर, सीआरएम यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डेटा आर्किटेक्ट संतोष सस्ते यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सर्व संधींचा लाभ घेत विविध तंत्रज्ञानांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, डेटा आणि सांख्यिकीचा अभ्यास करून त्याचे करिअरच्या संधींमध्ये रूपांतर करावे, असे सांगितले. 

सिनिअर मॅनेंजर आशुतोष भट्ट यांनी टेक महिंद्रा आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता लवकर ओळखून त्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत करेल असे सांगितले. ग्रुप मॅनेंजर जस्नीत कौर खन्ना म्हणाल्या, तंत्रज्ञान क्षेत्रात क्षणाक्षणाला नवे बदल आणि नव्या संधी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांनी या बदलांशी सातत्याने जुळवून घेत नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होत स्वतःची कौशल्ये विकसित केली तर यश तुमच्या पावलांशी येईल." यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे यांनी मनोगत व्यक्त केले. 

संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योगक्षेत्रातील बदलत्या प्रवाहांविषयी सखोल माहिती जाणून घेतली. यावेळी प्राचार्य, डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थीत होते.स्वागत सेंटर ऑफ एक्सलंन्सच्या हेड प्रा. वर्षा जुजारे यांनी केले. सूत्रसंचालन दर्शनी पाटील यांनी केले.आभार नेहा प्रसून यांनी मानले.