भास्कर जाधवांच्या गूढ WhatsApp स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा

भास्कर जाधवांच्या गूढ WhatsApp स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ मुळे सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचं WhatsApp स्टेटस चर्चेत आलं आहे. 'हज़ारों अच्छाईयो की कोई रसीद नाही होती. पर एक गलती का पुरा हिसाब रखा जाता हैं' असं सूचक विधान भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, एकीकडे भास्कर जाधव यांनी 'उद्धवसाहेब घाबरून जाऊ नका, ही वेळ देखील निघून जाईल. जे होतंय ते होऊ द्या, जे होणार आहे ते होणारच आहे. हे दिवस निघून जाण्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. उद्धवसाहेब डरो मत..'अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धीर देत सल्ला दिला आहे. देशात फक्त आम्हालाच राहायचं आहे, अशा दृष्ट हेतूने काँग्रेसने कुठलाही पक्ष संपवण्याचे काम केलं नाही. ओम बिर्ला यांना कोणी काय पत्र दिलं हे माझ्यासाठी गौण विषय असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले. अशातच आता भास्कर जाधव यांनी केलेली हि सूचक टिपणी आणि त्यामागचा नेमका हेतू काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.