सिद्धिविनायक मंदिरात विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या

सिद्धिविनायक मंदिरात विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकत कोट्यवधि भारतीयांच्या, क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण झळकावले.आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत यंदा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने 96 धावांनी विजय मिळवत विश्वचषक ट्रॉफी उंचावली.टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने पुन्हा एकदा क्रिकेट जगतात स्वत:चं स्थान पहिल्या क्रमांकावर नेलंय.

विश्वचषक जिंकल्यानंतर विश्वचषक ट्रॉफीसह टीम इंडियातील खेळाडूंनी विविध ठिकाणी फोटो काढले. त्यांचे एआय फोटोही व्हायरल झाले आहेत.आता, गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने विश्वचषक ट्रॉफीसह मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले.यावेळी, सिद्धविनायक गणेश ट्रस्टच्यावतीने कर्णधार आणि कोच दोघांचाही सन्मान करण्यात आला. 

तर, जिंकलेली ट्रॉफी बाप्पांपुढे ठेऊन दोघांनी आशीर्वाद घेतला.दरम्यान, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सूर्याने बाहेर असलेल्या मूषक म्हणजेच उंदीर मामाच्या कानात नेमकं काय म्हणलं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.सूर्याचा उंदीर मामाच्या कानात काहीतरी बोलतानाचा फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे, चाहत्यांना हा प्रश्न पडल्याचं दिसून येतंय.