शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश
जैनापूर - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय जैनपूरच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व विद्यापीठ संघात निवड झाली आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.

आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथे झालेल्या बुद्धिबळ (मुले) स्पर्धेमध्ये आदित्य खिलारे, शिवलिंग वाणी, वैभव शिंदे, वसीम फकीर, श्रेयश कोळी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. श्रीराम कृषी महाविद्यालय,पाणीव येथे झालेल्या खो - खो( मुली) स्पर्धेमध्ये शरद कृषीच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. कृषी महाविद्यालय फलटण येथे झालेल्या वेटलिफ्टिंगमध्ये शुभम चव्हाण प्रथम क्रमांक, शरीर सौष्ठव स्पर्धेत विवेक पाटील याने द्वितीय क्रमांक, सांगली येथे झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये ८०० मीटर धावणे स्पर्धेत प्रगती कर्नाळे हिने द्वितीय क्रमांक, बारामती येथे झालेल्या अविष्कार स्पर्धेमध्ये रिया वडगावकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
नांदेड येथे झालेल्या २७ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघात वैभव शिंदे व श्रुती शिंदे (बास्केटबॉल), प्रगती कर्नाळे, रतन गौडाजे (खो-खो), प्रज्ञा अकिवाटे (व्हॉलीबॉल), आदित्य खिलारे (बुद्धिबळ) तसेच पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ - धवल पाटील (फुटबॉल-गुजरात), अखिल भारतीय आंतर विद्यापीठ- शुभम चव्हाण (वेटलिफ्टिंग-भोपाळ) आदी संघात विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
जळगाव येथील २१ व्या महाराष्ट्र राज्य आंतर युवक महोत्सव इंद्रधनुष्यमध्ये राजल पटेल ललित कला पोस्टर प्रकारात राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ अविष्कार महोत्सव स्पर्धेसाठी रिया वडगावकर यांची निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, क्रीडाशिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांच्यासह सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन आ. डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.




