शहरातून ७ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन; नागरिकांचा महापालिकेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आज शहरभरातून ७ टन वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर तसेच सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.
या मोहिमेअंतर्गत आज घराघरातून जुने कपडे, उशा-गाद्या, खराब इलेक्ट्रीक वस्तू, बॅग, पर्स, ट्यूबलाईट, बल्ब, कालबाह्य औषधे, शुज, काच, लाकडी फर्निचर, टीव्ही, टप, चटया, सोफा सेट, तेलाचे डबे आदी वस्तू संकलित करण्यात आल्या. महापालिकेच्या घंटागाड्या व टिप्परद्वारे संपूर्ण शहरातून हे संकलन करण्यात आले.
महापालिकेका ही मोहीम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांनी अशा टाकाऊ वस्तू उघड्यावर किंवा रस्त्यावर न टाकता थेट प्रभागातील घंटागाडीकडे सुपूर्त कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.