शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; आता ऊसाला मिळणार 'इतका' दर

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; आता ऊसाला मिळणार 'इतका' दर

मुंबई -  2025 - 26 या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतिटन तब्बल ३५५० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केला.

या निर्णयामुळे देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, उत्साह, आणि नवीन उमेद मिळणार आहे. वाढलेल्या हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून, हा निर्णय कृषिक्षेत्रासाठी एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे.