प्रणित मोरेच्या अडचणी वाढणार? गृह विभागाकडून जुन्या व्हिडिओंचीही चौकशी; पंकज भोयरांचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : प्रणित मोरेच्या शोमधले '370 रुपयांची बिर्याणी' आणि डॉक्टर सेजल पवार या तरुणीचं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचं अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं झालं आणि देशभरात मोठा गदारोळ झाला असून देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच डॉ. सेजल पवारने KEM रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचं संपूर्ण रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे प्रणित मोरेने देखील सोशल मीडियातून माफी मागितली आहे. माझी ती सर्वात मोठी चूक होती. मला माफ करा आणि पुन्हा एक संधी द्या, मी नक्कीच चांगला व्यक्ती बनून दाखवेन असं तो म्हणाला आहे.

असं असताना आता कॅामेडीयन प्रणित मोरे याच्या अडचणी वाढणार असून गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या यापूर्वीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. यापूर्वी अपलोड केलेले व्हिडिओ कंटेन्टची सायबर पोलीसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.
'विनोद न करता विकृती करत असाल, तर थेट कारवाई होईल' असा सज्जड दम गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. ३७० ची बिर्याणीची वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि डॅा. तेजस पवारवर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.'प्रेक्षक वाढवण्याच्या नादात वादग्रस्त कंटेट अपलोड केला तर यापुढे कारवाई होणार. असेही पंकज भोयर म्हणाले.




