स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई ; खंडणी व दरोडा प्रकरणी दोघास अटक

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात विशाल उर्फ गोटया अविनाश लातुर वय. २५, अजय उर्फ अज्या अविनाश माने वय ३० आणि अल्पवयीन मुलगा प्रेम वय १७ या तिघांवर मोका सारखा गुन्हा दाखल आहे. ते तिघेही सध्या जामिनावर सुटले होते. मात्र, विशाल लातुर आणि अजय माने याची राजारामपुरी परिसरात मोठी दहशद होती. विशाल लातुर आणि अजय माने या दोघांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली की, ते तिघे चाकण पुणे या ठिकाणी आहेत. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर केले.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे, गजानन गुरव आदींनी सहभाग घेतला.