अंगावर शाई फेकली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास लवांडेंवर हल्ला

अंगावर शाई फेकली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास लवांडेंवर हल्ला

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शाईफेक केल्याची घटना आज घडली आहे. आज सकाळी मी प्रवचनाला जात असताना मला संग्राम भंडारे आणि १० ते १५ गोरक्षकानी पकडले आणि माझ्या अंगावर शाई फेकली आणि मला मारहाण केली, अशी माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून दिली आहे.

 तर सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी म्हटलंय की, "सर्वांनी आत्ता #लोणीकाळभोर पोलिस स्टेशनला यावे. वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे".

तर या हल्ल्याप्रकरणी आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं की, हा व्यक्ती सातत्याने वारकरी सांप्रदायाप्रती जे पूज आणि महान संत आहेत ज्याच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे ज्यांनी तो टिकवून ठेवला अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर घुसखोर असा संबोधत होता ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रात आहेत ज्यांनी व्यसनमुक्तीचा मोठा कार्य या महाराष्ट्रात उभं केलं त्यांना अशा पद्धतीने त्यांचा अपमान केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातून हा प्रकार घडलेला आहे माझे यानिमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगल बच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा.