केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन

कोल्हापूर (प्रतिनिधी): भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारला रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. 

या वेळी कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत  खासदार धनंजय महाडिक यांनी केले. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता श्री. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत.