गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकास अटक ; २८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकास अटक ; २८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शरद मारूती परबंकर वय ३६, रा. मळगे बुद्रूक असे अटक केलेल्याचे नाव असून याच्याकडून ८,२५०/- रूपये किंमतीचा ३३० ग्रॅम गांजा, एक मोबाईल हँडसेट,  दुचाकी असा एकुण २८,२५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

शरद परबंकर हा मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कागल ते निढोरी जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून गांजा या अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेला असताना पथकाने सापळा रचून शरद परबंकर याला ताब्यात घेतले. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार विशाल खराडे यांच्यासह आदी पोलीसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.