छत्रपती संभाजीनगर पालिकेची इमारत कब्रस्तानावर? मंत्री शिरसाठ यांच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या एका वक्तव्यामुळं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागलं आहे. पालिकेला ग्रहण लागण्याचं कारण महापालिका इमारत ज्या जागेवर उभा आहे, इथं मुडदे गाढले जायचे. कब्रस्तानचा हा भाग असल्याने इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि तुम्ही बेचैन होता. यातून मुक्ती हवी असेल तर इमारत चांगल्या ठिकाणी करा असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागल्याचं वक्तव्य शिरसाठ यांनी केलं आहे. महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभा आहे तिथं मुडदे काढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि तुम्ही बेचैन होता. यातून मुक्ती हवी असेल तर इमारत चांगल्या ठिकाणी करा. शहर चांगलं करायचं आहे. आत्म्यालाही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर महापालिकेने खरेदी केलेल्या नव्या अग्निशामक दलाच्या गाडीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बोलत होते.




