डीकेटीईचे प्रा. उत्कर्ष पाटील यांना पी.एच.डी. प्रदान

डीकेटीईचे प्रा. उत्कर्ष पाटील यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी (प्रतिनिधी): डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये जनरल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. उत्कर्ष पाटील यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा पाटील हे गेली ७ वर्षापासून सहायक प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘इन्फलुएन्स ऑफ हायब्रीड फीलर्स ऑन मॉरफॉलॉजीकल मेकॅनिकल अ‍ॅण्ड थर्मल प्रॉपर्टीज ऑफ पीपी बेस्ड बायनरी ब्लेंडस अ‍ॅण्ड देयर नॅनो कंपोझिट अ‍ॅझ अ‍ॅन अल्टरनेटीव्ह फॉर पीव्हीसी पाईप’ या विषयावर पी.एच.डी.प्रबंध पूर्ण केला आहे.

या संशोधनासाठी त्यांना म.शासन अनुदानित स्वायत्त शिक्षण संस्था नांदेड येथील विभागप्रमुख प्रा डॉ प्रविण कुबडे यांचे मार्गदर्शन लाभले.

पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ. ए.के.घाटगे, डॉ व्ही.आर.नाईक उपस्थित होते.