सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या संगीत सोहळ्यात ‘किंग खान’ची झलक; पाहुणेही झाले थक्क
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या फंक्शनची सध्या मनोरंजनसृष्टीसह राजकीय वर्तुळात चर्चा आहे.रेवती सुळेच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने खास हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

रेवतीचा विवाह नागपूरमधील उद्योगपती आणि राजकारणी अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीसोबत होत असून, या प्री-वेडिंग सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान स्टेजवर नवदाम्पत्यासोबत खास क्षण शेअर करताना दिसतोय.याचसोबत शाहरुखने आपल्या सुपरहिट ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.काळ्या रंगाच्या स्टायलिश आउटफिटमध्ये शाहरुखचा नवा लूकही चर्चेचा विषय ठरला.
सध्या तो आपल्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी शाहरुखची ऊर्जा आणि त्याचा सहज मोहक अंदाज पाहून कौतुकाचा वर्षाव केला.रेवती सुळे ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून शिक्षण घेतले आहे.सारंग लखानीने कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले आहे.दोघांचा विवाह आज मुंबईत पार पडणार असून, त्यानंतर ५ जुलै रोजी पुण्यात रिसेप्शन होणार आहे.




