डीकेटीईच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ६० हून अधिक संशोधनाला भारत सरकारकडून डिझाईन व युटिलिटी पेटंट मंजूर
इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील डीकेटीई संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन केले आहे. संस्थेच्या एआयसीटीई डीकेटीई आयडिया लॅब अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी विकसित केलल्या ६० हून अधिक संशोधन संकल्पनांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन व युटिलिटी पेटंट मंजूर झाले आहे. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणाचा प्रभावी संगम घडवत डीकेटीई संस्था विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दर्जाची संशोधन क्षमता विकसित करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधनवृत्तीला आणि तांत्रिक कौशल्याला मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण दाद मानली जात आहे.

डीकेटीईमध्ये संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती आणि बौध्दीक संपदा हक्क (आयपीआर) यांना विषेश प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना कल्पनेपासून पेटंट आणि उत्पादनापर्यंतचा प्रवास अनुभवता यावा यासाठी संस्थेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोन्मेषी विचारसरणी, उद्योजकीय दृष्टीकोन आणि तांत्रिक नेतृत्व विकसित होत आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला मिळालेली ही मान्यता मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि नवोपक्रमाधारित भारत घडविण्याच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान आहे.विद्यार्थ्यांच्या कल्पनांना पेटंटच्या माध्यमातून राष्ट्रीय मान्यता मिळवून देत उद्योग, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणारे संशोधक व उद्योजक घडविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.
स्टार्टअप कटटा या अभिनव उपक्रमााद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील समस्या ओळखून त्यावर संशोधनाधारित, नाविण्यपूर्ण आणि उपयुक्त तांत्रिक उपाय विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. याच उपक्रमातून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वस्त्रोद्योगाबरोबरच विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन,गुणवत्ता नियंत्रण,उत्पादन प्रक्रिया आणि प्रयोगशाळांमधील तांत्रिक विश्लेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून उद्योगाभिमुख संशोधनाला नवी दिशा देणारे आहे.
या संशोधनासाठी संस्थेच्या एआयसीटीई डीकेटीई आयडिया लॅब, ५जी लॅब,स्टार्टअप कटटाअॅपल लॅब,बॉश्च लॅब,अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनओव्हन्स मध्ये तांत्रिक मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना संशोधनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वरुप देत त्यांना पेटंटची मान्यता मिळवून दिली आहे.
विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.एल.एस. आडमुठे,उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही आर.नाईक, डॉ ए.के.घाटगे व आयडीया लॅबचे डॉ.एस.बी.रायजाधव याचे मार्गदर्शन लाभले आहे.




