तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचं पालकांकडून स्वागत; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उचललं मोठं पाऊल

तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचं पालकांकडून स्वागत; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उचललं मोठं पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळांच्या आवारात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयाचे पालकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. अनेक पालकांनी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याचे सांगितले. प्रशासनात तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी असणे गरजेचे असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.आजपासून शाळांच्या परिसरात जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध लागू झाले आहेत. खाऊची दुकाने दिसल्यानंतर मुलांचा होणारा हट्ट आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता हा निर्णय योग्य असल्याचे पालकांचे मत आहे.

"विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी असे निर्णय आवश्यक होते. आज कुणीतरी धाडस दाखवलं. तुकाराम मुंढे यांनी योग्य पाऊल उचललं असून त्यांचे आभार," अशा शब्दांत पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एफडीएचे शाळांना फर्मान, कोणते आदेश देण्यात आले आहेत पुढीलप्रमाणे : शाळा आणि 50 मीटर परिसरात जंक फूडवर बंदी,चॉकलेट, कोल्ड्रिंक्सही विक्रीवर बंदी,जंक फूडची विक्रीच नव्हे तर जाहिरातांनाही बंदी,राज्यातील सर्व शाळांना बंदी आदेश लागू,सर्व बोर्डांच्या शाळांना लागू असतील बंदी आदेश, 

गोड आणि खारे अन्न पदार्थांच्या विक्रीवर बंदी,चीप्स,समोसा,वडे,भजी अशा खोलवर तळलेल्या पदार्थांना बंदी,फळे, भाज्या, कडधान्ये विक्रीस मुभा 

संपूर्ण धान्यांपासून बनवलेले पदार्थ, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ विक्रीस मुभा,नियम मोडल्यास शाळा,कँटीनचालक,पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवान रद्द होणार,पाळणाघर व डे केअर यांना बंदी आदेशातून वगळले आहे.