प्रवेश प्रक्रियेत 'डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक'चा दबदबा; गुणवंत विद्यार्थ्यांची पहिली पसंती
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील नामांकित डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संस्थेने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दर्जेदार शिक्षण आणि उत्कृष्ट निकालाच्या जोरावर यंदाही उच्च गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या संस्थेला प्रवेशासाठी प्रथम पसंती दिली आहे.

यंदा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेत ९७.२०% गुणांसह साक्षी जांभळे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ९५.४०% गुणांसह अनुष्का पडवळ, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ९५% गुणांसह यशश्री खडके आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ९३.८०% गुणांसह नम्रता खाडे या गुणवंतांनी प्रवेश मिळवला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
"गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण हीच आमची ओळख आहे. याच विश्वासामुळे गुणवंत विद्यार्थी दरवर्षी संस्थेला प्राधान्य देतात," असा विश्वास डॉ. ए. के. गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला. तंत्रशिक्षण मंडळाने संस्थेला 'एक्सलंट' श्रेणी दिली असून, हा उच्च दर्जा कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले.
यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. अजय बंगडे, प्रा. अर्चना जोशी, प्रा. राज अलास्कर, विजय पाटील, दीपाली पाटील, सागर पाटील आणि विकास पाडळकर उपस्थित होते.




