प्रश्न गायब, पुरावा शून्य; मनीषा मांढरेची ट्रिक पाहून तपास यंत्रणाही चक्रावली

प्रश्न गायब, पुरावा शून्य; मनीषा मांढरेची ट्रिक पाहून तपास यंत्रणाही चक्रावली

मुंबई (प्रतिनिधी) : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची NTA च्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे हीची देखील NTA च्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली. मोटेगावकरने त्याच्या आर्थिक ताकतीच्या बळावर हे घडवून आणलं. म्हणूनच सीबीआयने मोटेगावकर हा पेपर लिक करणाऱ्या गँगचा सक्रिय सदस्य असल्याचं म्हटलं आहे. 

नीट पेपरफुटीप्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. मनीषा मांढरेने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. मनीषा मांढरेविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता.  

पेपरमधील सर्व प्रश्न डोक्यात ठेवून मनीषा मांढरेने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवले. तसेच गेल्या 25 वर्षांपेक्षा एकच विषय जास्त काळ शिकवल्याने कोणताही प्रश्न लिहून ठेवावा लागला नाही. त्यामुळे मनीषा मांढरेच्या विरोधात सीबीआयला पुरावे शोधावे लागतील. सीबीआयचं तपासपथक लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावर आहे. तपासयंत्रणेकडून पुराव्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून मनीषा मांढरेच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासकीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनीषा मांढरेचा नीट पेपरफुटीमध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मनीषा मांढरे हिचा नीट पेपरफुटीमध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर ती ज्या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती त्या मॉडर्न महाविद्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मनीषा मांढरे हिच्या निलंबनाबाबत चर्चा करण्यात आली.  या चर्चेनंतर अखेर मनीषा मांढरेच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. मनीषा मांढरे ही या महाविद्यालयात प्राणीशास्त्राची प्राध्यापिका होती.