भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणं..; शरद पवारांची ठाम भूमिका

भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणं..;  शरद पवारांची ठाम भूमिका

पुणे - गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद संपून दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनेकदा दोघे एकत्र कार्यक्रमांत दिसल्याने चर्चांना आणखी उधाण आले होते. मात्र, पिंपरी - चिंचवडमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता आढावा मेळाव्यात शरद पवारांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम दिला. “भाजपसोबत सत्तेसाठी गेलेल्यांना सोबत घेणं शक्य नाही. ही भूमिका काँग्रेसच्या विचारधारेशी सुसंगत नाही. कोणाशी संबंध ठेवले तरी भाजपसोबतचा संबंध स्वीकारार्ह नाही. संधीसाधूपणाच्या राजकारणाला आम्ही प्रोत्साहन देणार नाही,” अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी मांडली. 

शरद पवार यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख स्पष्टपणे त्यांच्यावरच होता. ‘सगळ्यांना एकत्र घ्या’ अशा प्रस्तावांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं, “सगळ्यांना घेण्याचा अर्थ गांधी, नेहरू, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार असायला हवा. अशा विचारांना मी पाठिंबा देईन.”