मोठी बातमी | सिंगर शान राहत असलेल्या बिल्डिंगला आग,मोठी जीवितहानी टळली

मोठी बातमी | सिंगर शान राहत असलेल्या बिल्डिंगला आग,मोठी जीवितहानी टळली

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक शान (Singer Shaan ) राहत असलेल्या  बिल्डिंगला मध्यरात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने यात कोणतीही  जीवितहानी झाली नाही. कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.या घटनेची माहिती मिळताच तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेकांची सुखरूप सुटका करत अडकलेल्यांना घराबाहेर काढलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह नावाच्या रहिवासी इमारतीमध्ये ही भीषण आग लागली होती.

बिल्डिंगला आग  तेंव्हा  बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान घरातच 

इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. नंतर अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आणि जवान घटनेची माहिती मिळताच लगेच तेथे दाखल झाले.यानंतर घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. याच इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान राहतात. ही आग लागली तेव्हा शान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत घरातच होते, अशी माहिती आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही वा वित्तहावी देखील झाली नाही. (Singer Shaan )

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती 

प्राथमिक तपासानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले होते. यात सर्वजण सुखरूप आहेत. गायक शान यांचे कुटुंबीय देखील सुखरूप आहेत.