'या' तारखेला होणार रश्मिका मंदाना - विजय देवरकोंडाचं लग्न..!
मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघेही कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनीही जोर धरला होता. मात्र, अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही रश्मिकाच्या अंगठीमुळे या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.आता या चर्चांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून, दोघांच्या लग्नाच्या बातम्या जोरात पसरत आहेत. हे लोकप्रिय कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे ही तारीख विशेष मानली जात आहे. दोघांनीही उदयपूरमधील हेरिटेज प्रॉपर्टीज लग्नासाठी फायनल केल्या आहेत. साखरपुड्याप्रमाणेच लग्न सोहळाही अत्यंत खासगी ठेवण्यात येणार असून, केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनाच आमंत्रण दिले जाणार आहे. लग्नानंतर हे कपल हैदराबादमध्ये एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती आहे. मात्र, या रिसेप्शनसाठीही मोजक्याच लोकांना निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे.




