वादातून धमक्यांपर्यंत प्रकरण; प्रसाद वेदपाठकांना मनसेचा आधार, अविनाश जाधवांचे आश्वासन

वादातून धमक्यांपर्यंत प्रकरण; प्रसाद वेदपाठकांना मनसेचा आधार, अविनाश जाधवांचे आश्वासन

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर मुंबईत रस्त्यांवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेत तात्काळ पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात याव्या, अन्यथा आम्ही काळा रंग मारु, असा इशारा देण्यात आला. 

सदर प्रकरणानंतर माझ्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रसाद वेदपाठकने केला आहे. काही लोक माझा पाठलाग करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज माझी मदत करा, असं म्हणत प्रसादने म्हटलं आहे. दरम्यान, प्रसाद वेधपाठकने काल मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. तसेच मनसे नेहमी तुझ्यासोबत आहे, असा शब्दही अविनाश जाधव यांनी प्रसादला दिला. 

आमची बांधिलकी जनतेशी आहे.. आपण जो आवाज उठवला आहे, तो एका वृती विरोधात आहे.. योग्य गोष्टीच्या मागे मनसे नेहमीच उभी राहते आणि राहणार.. आम्ही मतांसाठी नाही तर अस्मितेसाठी लढतो, असं अविनाश जाधव म्हणाले.