डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

कोल्हापूर प्रतिनिधी -  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (तंत्रनिकेतन),कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील  विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. इन्स्टिट्यूटची  दैदिप्यमान शैक्षणिक परंपरा, गुणवत्तापूर्ण अध्यापन, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग तसेच  विविध उपक्रमांमुळे इन्स्टिट्यूटला विद्यार्थी व पालकांची अग्रगण्य पसंती लाभली  आहे. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत झालेनंतर  त्यांना इन्स्टिट्यूटच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. "डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट निकाल, प्लेसमेंट्स आणि विद्यार्थी-केंद्रित वातावरण पाहून आम्ही या इन्स्टिट्यूटची निवड केली. येथे प्रवेश मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत " अशी भावना नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 


 

संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या संदेशात सांगितले, "शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर इन्स्टिट्यूटचा भर आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी किंवा पदविका संपादन करण्यापुरते शिक्षण न घेता ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांचा समतोल साधणारे शिक्षण घ्यावे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे." संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी "आजचे विद्यार्थी हे उद्याचे अभियंते, संशोधक आणि उद्योजक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रम यांचा स्वीकार करावा. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे नसून विचारक्षम, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे" असे विचार व्यक्त केले.

संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, "तांत्रिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञान  आणि उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःला सक्षम अभियंता म्हणून घडवावे.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. योग्य मार्गदर्शन, सकारात्मक दृष्टिकोन आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते." नव्या उत्साहाने शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या या विद्यार्थ्यंना सर्व मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. 

इन्स्टिट्युटचे प्राचार्य डॉ . सुहास सपाटे, रजिस्ट्रार अमित आवाड , सर्व विभागप्रमुख, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी  यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इन्स्टिट्यूट  सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.