गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शाहूवाडी - आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर आज पंचायत समिती सभागृह हॉल (पहिला मजला), शाहूवाडी येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.

शिबिराचे आयोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या निर्देशानुसार तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शाहूवाडी आणि तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

शिबिरात एकूण ४४ सचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बी.पी., शुगर, सीबीसी, एलएफटी, केएफटी, लिपिड प्रोफाइल, टीएफटी, आर.ए., स्मिअर फॉर एमपी या तपासण्या करण्यात आल्या. तपासणीसाठी डॉ. रोहन बच्चे, डॉ. सोनल सातपुते, डॉ. तेजस्विनी माने यांच्यासह आरोग्य विभाग व सहकार विभागातील विविध कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये अर्जुन कांबळे, उत्तम बर्गे, दिलीप जाधव, सुरज पाटील, प्रणाली खारवते, मधुरा सुतार, ऋषिकेश वरुटे, स्वप्नील पाटील, सुरज खुटाळे तसेच सहकार अधिकारी रमेश बारडे (श्रेणी-१) यांचा समावेश होता.

आरोग्य शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी व सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या उपक्रमामुळे सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे.