सर पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांना १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
कागल (प्रतिनिधी) - छत्रपती शाहू महाराजांचे बंधू,कागल संस्थानचे पाचवे राजे, श्रीमंत सर पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांना १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. बापूसाहेब महाराज चौकातील त्यांच्या पुतळ्यास राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगराध्यक्षा सविता माने, शाहूचे संचालक सतीश पाटील, नगरसेवक जयवंत रावण, दीपक मगर, अरुण गुरव, बाळासाहेब माळी, प्रवीण काळबर, सुशांत कालेकर, अमित पिष्टे, अर्जून नाईक, सतीश घाटगे, साधना पाटील, रंजना सणगर, गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, शिवाजीराव माळकर, नंदकुमार माळकर, सूर्यकांत कदम मुख्याधिकारी अजय पाटणकर,आदी उपस्थित होते.




