गुजरात एसटी अपघात: शवागाराबाहेर नातेवाईकांचा हंबरडा, हृदयद्रावक दृश्य

गुजरात एसटी अपघात: शवागाराबाहेर नातेवाईकांचा हंबरडा, हृदयद्रावक दृश्य

मुंबई (प्रतिनिधी) : गुजरातमधील बारडोलीच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताला 18 तासांहून अधिक काळ उलटला असला तरी अनेक कुटुंबीयांचा आक्रोश अद्याप कायम आहे. अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ एका मृतदेहाची ओळख पटली आहे. उर्वरित सहा मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घ्यावा लागत आहे. 

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून आलेले नातेवाईक बारडोली रुग्णालय आणि शवागारबाहेर आपल्या प्रियजनांच्या शोधात भटकताना दिसत आहेत. मात्र डीएनए अहवाल कधी येणार, मृतदेहांची ओळख कधी पटणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांमध्ये संताप आणि असहायता वाढत आहे. आमचे नातेवाईक कुठे आहेत, ते जिवंत आहेत की मृत, याची तरी माहिती द्या, असा हंबरडा या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. 

गुजरात राज्यातील बारडोलीजवळ झालेल्या भीषण बस अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापैकी एका मृतदेहाची ओळख आधीच पटली होती. मात्र उर्वरित सहा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घेण्यात आला आहे. पाच प्रवाशांच्या नातेवाईकांनी बारडोली येथील रुग्णालयात डीएनए नमुने दिले असून त्याद्वारे मृतांची ओळख निश्चित केली जाणार आहे. मात्र अद्याप एका महिलेच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही.

जरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाला. बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्राच्या एसटी बस समोरासमोर धडकल्या. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 41 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, फक्त एका ड्रायव्हरची ओळख पटू शकली आहे. उर्वरीत 6 जणांची अद्यापही ओळख पटलेली नाही. उवा गावापासून काही अंतरावर पाण्याचा टँकर पलटी झाला होता. यावेळी धुळे आगाराची बस सुरतकडे जात होती. टँकर पलटी झाल्याचे समजून न आल्याने चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले, चालकाने बस वळविण्याचा प्रयत्न केला असता, ही बस महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेली. दरम्यान, सुरत-जामनेर ही बस आली. दोन्ही बस एकमेकांना धडकल्या. सुरत-जामनेर बस मार्गालगतच्या पाटात पडल्याने तिला आग लागली.