पंचगंगा नदीपात्रात विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांनी राबवली स्वच्छता मोहीम
कोल्हापूर (प्रतिनिधी): पावसाअभावी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. नदीपात्राच्या काठावरील बहुतांश भाग रिकामा झाला आहे. आज कोल्हापुरातील विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांनी एकत्र येत जवळपास तीन तास पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवली.

यावेळी नागरिकांनी नदीतील रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कागद, कागदाचे पुठ्ठे इतर कचरा बाहेर काढला.या मोहिमेत इस्कॉन परिवार, पंचगंगा विहार मंडळ, पंचगंगा आरती मंडळ, हिंदू जनजागरण समिती, वृक्ष मित्र मंडळ, कोल्हापूर हॉटेल असोसिएशन, प्रजासत्ताक संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिलीप देसाई, राजेंद्र किंकर, उज्वल नागेश्वर, सचिन शानबाग, महेश कामत, संदीप देसाई, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, शीला माने आदी सहभागी झाले होते.




