कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनतर्फे ज्योतिबा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम
कोल्हापूर (प्रतिनिधी):कोणत्याही प्रश्नावर “नो रिएक्शन, डायरेक्ट एक्शन” या कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशन च्या नावलौकिक प्रमाणे यावेळी कुशीरे ते जोतिबा पायी मार्गावर प्लास्टिक कचरा सफाई चे काम करणेत आले . वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात रविवारचे खेटे चालू आहेत. कुशिरे गावातून जोतिबा येथे पायी जाणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. यातील काही लोकांचे कडून अजाणतेपणे प्लास्टिक कचरा फेकला जातो आहे. या मार्गाचे होणारे विद्रुपीकरण ड्रीम टीम च्या मुला मुलींनी कमी करणेसाठी आज सुमारे मोठ्या २६ बैग भरुन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले. या मधे प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, चॉकलेटचं रॅपर्स आणि दारूच्या बाटल्याचा सुद्धा समावेश होता.

या मुलींचा उत्साह पाहून जिल्ह्याचे कलेक्टर अमोल येडगे, जिल्हा पोलिस प्रमूख योगेश कुमार गुप्ता, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी हे सुद्धा त्यांच्या सोबत उपक्रमामधे सहभागी झाले होते. त्यांनी ड्रीम टीम च्या कामाचे कौतुक सुद्धा केले. या उपक्रमाचे आयोजन अर्पिता राऊत, श्रेया चौगुले, आंचल कटारिया, सुप्रिया चौगुले, अद्वैत कटारिया, श्रुती चौगुले, पवन पांचाळ, सई भापकर, ऋषिकेश पाटील, किरण काखंडकी यांनी केले. या उपक्रमाअंतर्गत संकलन केलेला कचरा वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीस देण्यात आला. उपक्रमानंतर अमोल येडगे यांनी लोकांना अशा प्रकारे प्लास्टिक कचरा न फेकण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनच्या वतीने लवकरच लोकसहभागातून या मार्गावर डस्टबिन बसविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.




