महाशिवरात्रीला भारताचा पाकिस्तानवर महाविजय, अंतिम आठ संघात प्रवेश

महाशिवरात्रीला भारताचा पाकिस्तानवर महाविजय,  अंतिम आठ संघात प्रवेश

(वृत्तसंस्था) : कोलंबो - टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठ्या महामुकाबल्यात भारताच्या इशान किशनने तुफान बॅटिंग केली. पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात इशानने केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.

ईशान किशनच्या धुव्वादार फलंदाजीनंतर भारतीय संघाच्या, १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजीची पावरप्लेमध्ये दाणादाण उडाली आहे. ६ व्या षटकाच्या अखेरीस ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला त्यावेळी पाकिस्तानची अवस्था ४ बाद ३८ अशी अत्यंत नाजूक झाली होती. यावेळीच भारताने सामन्यावर आपली पकड पूर्णपणे मिळवलेली दिसून येत होते. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या पहिल्याच षटकात पाकिस्तानच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या  नाहीत. यानंतर पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाज समोर गुडघे टेकण्याशिवाय शिवाय पर्याय राहिला नाही. अखेर हा सामना भारताने 61 धावाने जिंकून वर्ल्ड कपच्या अंतिम आठ मध्ये प्रवेश केला आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाने सर्वत्र जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली.