‘कांतारा चॅप्टर 1’ बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी ; 'अवतार', 'टायटॅनिक' लाही टाकलं मागे

‘कांतारा चॅप्टर 1’ बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी ; 'अवतार', 'टायटॅनिक' लाही टाकलं मागे

मुंबई - ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर 1’ सध्या बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करीत आहे. प्रेक्षकांच्या अफाट प्रतिसादामुळे आणि दिवसागणिक वाढणाऱ्या कमाईमुळे या चित्रपटाने अवतार, टायटॅनिकसारख्या आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला याचीच चर्चा लागली आहे.

2025 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरत असलेल्या या चित्रपटाने, 'कांतारा' च्या पहिल्या भागापेक्षा अधिक प्रचंड यश मिळवलं आहे. रिलीजपासूनच देश - विदेशात प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात ‘कांतारा चॅप्टर 1’ हा जगात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

https://x.com/PrathyangiraUS/status/1976826098701959283?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1976826098701959283%7Ctwgr%5E9da99a63cbfc758a5f9a87c8aea2525da06b64d7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fentertainment%2Fkantara-chapter-1-box-office-collection-rishab-shetty-film-beats-avatar-and-leonardo-dicaprio-movie-crosses-500-crore-worldwide%2F946446

फक्त 10 दिवसांतच या चित्रपटाने विक्रमी यश मिळवलं आहे. दररोज सरासरी 20 कोटी रुपयांच्या पुढे कमाई करणाऱ्या या सिनेमाने, शुक्रवारीच तब्बल 22 कोटी रुपये मिळवले. भारतात 9 दिवसांत या चित्रपटाची नेट कमाई 359.40 कोटींवर पोहोचली असून, ग्रॉस कमाई 403.25 कोटी रुपये झाली आहे. विदेशात कमाईचा वेग तुलनेनं थोडा कमी असला तरीही ‘कांतारा चॅप्टर 1’ ने परदेशातही 72 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाचं एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 497 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. होम्बळे फिल्म्सच्या माहितीनुसार, सिनेमा सध्या 509 कोटी रुपयांचा टप्पा पार करून पुढे जात आहे.

यशाचं आणखी एक मोठं पाऊल म्हणजे या चित्रपटाने लिओनार्डो डिकॅप्रियोच्या One Battle After Another आणि टेलर स्विफ्टच्या The Official Release Party of a Showgirl यांच्यासारख्या चित्रपटांनाही कमाईत मागे टाकलं आहे. डिकॅप्रियोच्या चित्रपटाने 40 मिलियन डॉलर कमावले असताना, ‘कांतारा चॅप्टर 1’ ने 53 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

आता सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे लागलं आहे की, हा सिनेमा 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचतो का नाही. मात्र आतापर्यंतचा वेग पाहता, ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा दक्षिणात्य चित्रपटांना जागतिक व्यासपीठावर भक्कम स्थान मिळवून दिलं आहे, हे नक्की.