घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाच्या पत्नीने केला खुलासा ; गोविंदाकडे केली 'ही' मागणी

घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाच्या पत्नीने केला खुलासा ; गोविंदाकडे केली 'ही' मागणी

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. प्रत्येक वेळी या अफवा पसरतात, तेव्हा हे जोडपं एकत्र येऊन त्या चर्चांना पूर्णविराम देतं, पण काही दिवसांत पुन्हा या बातम्या समोर येतात. या वेळीही गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत असलेल्या अफेअरमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. अलिकडच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना सुनीता अहुजाने या चर्चांवर भाष्य करत आपलं मत स्पष्ट केलं. 

सुनीता अहुजा म्हणाली, प्रत्येक स्त्रीने स्वतः साठी उत्पन्नाचं साधन ठेवायला हवं. नवरा पैसे देतो, पण अनेकदा मागावं लागतं. स्वतः ची कमाई वेगळीच आनंद देते. मी सध्या आपल्या मुलगी टीना आणि मुलगा यशसोबत चार बेडरूमच्या घरात राहते, तर गोविंदा त्यांच्यासोबत राहत नाही. हे घर आमच्यासाठी लहान आहे. म्हणून मी गोविंदाला सांगते, ‘चिची, मला मोठा हॉल असलेलं पाच बेडरूमचं घर विकत घे, नाहीतर बघ काय होतं ते!

अभिनेत्याच्या अफेअरबाबत विचारले असता सुनीता म्हणाली, मीही हे ऐकलंय, पण स्वतः च्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मी काही बोलणार नाही. मी ऐकलंय की ती एक मराठी अभिनेत्री आहे, पण मी जोपर्यंत खात्री करत नाही, तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. आता या सगळ्या गोष्टी करण्याचं वय नाही. गोविंदाने आता मुलगी आणि मुलगा यशच्या करिअरकडे लक्ष द्यायला हवं. मी नेहमीच खरं सांगते, कारण मी खोटं बोलत नाही.