महिला गटविकास अधिकाऱ्याच्या अटकेचा निषेध ; जिल्हा परिषदचे अधिकारी सामूहिक रजेवर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - वर्धा येथील गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे (पंचायत समिती, जि. आर्वी) यांना 02 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशीरा कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता तसेच खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुढील दिवशी न्यायालयाने त्यांना 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.

महिला अधिकारी असल्याने आवश्यक असलेल्या कायदेशीर व प्रक्रियात्मक सावधगिरीकडे दुर्लक्ष झाल्याचेही मत महाराष्ट्र विकास सेवा संघटना यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी 03 डिसेंबर ते 05 डिसेंबर 2025 या कालावधीत सामूहिक रजा घेण्याचा निर्णय घेत आहेत. तीन दिवसांची रजा मंजूर करण्याची विनंती महाराष्ट्र विकास सेवा संघटना, शाखा कोल्हापूरच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे.
सामूहिक रजेवर जाणारे अधिकारी पुढीलप्रमाणे -





