मुंबई-पुणे मिसिंग लिंक ब्रिजवर भीषण साखळी अपघात; चार वाहनांची धडक
मुंबई (प्रतिनिधी) : पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या फॉर्च्युनर कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबून तिसऱ्या लेनमध्ये गाडी थांबवली. त्यामुळे मागून येणाऱ्या एका व्हेरना कारने फॉर्च्युनरला धडक दिली.व्हेरना कारच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारनेही पुढच्या वाहनाला धडक दिली, ज्यामुळे तीन वाहनांचा चैन-लिंक परिसरात अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस, एम.एस.आर.डी.सी. कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. नंतर, क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की, फॉर्च्यूनर कार दुसऱ्या कारवर चढल्याचंही फोटोमधून दिसून येत आहे. तर, काही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.अपघातामुळे वाहतूक खोळंबल होती, तर अनेक वाहनांतील प्रवाशांनी खाली उतरुन मदतीसाठी प्रयत्न केले, सध्या मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.




