स्मशानभूमी स्वच्छतेसाठी राजाराम बंधारा ग्रुपचा पुढाकार

स्मशानभूमी स्वच्छतेसाठी राजाराम बंधारा ग्रुपचा पुढाकार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने नेहमीच काही ना काही समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. असाच एक उपक्रम राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने आज राबवण्यात आला. राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने कसबा बावड्यातील स्मशानभूमी मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानावेळी डॉ. संदिप नेजदार, निशिकांत कांबळे, युवा नेतृत्व प्रदीप उलपे, रुपेश पाटील तसेच राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य शिवाजी ठाणेकर, संजय चौगले, विजय रावण, विनायक आळवेकर,संजय जासुद, सुर्यकांत सुतार हंनमत सुर्यवंशी व जितु केंबळे यांनी सहभाग घेतला.