तांबे सरांच्या 'श्रद्धा इन्स्टिट्यूट'चा नवा इतिहास! १०७ विद्यार्थ्यांना ५००+, तर १९ जणांना ६०० पेक्षा जास्त गुण!
कोल्हापूर/प्रतिनिधी: वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचा नवा इतिहास रचत, श्री. ए. आर. तांबे सर यांच्या 'श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट'ने NEET-2026 परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे! यंदाच्या निकालात एकाच शाखेतून तब्बल १०७ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवत पश्चिम महाराष्ट्रात एक नवा आणि मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या निकालात संस्थेच्या ६७ विद्यार्थ्यांनी ५५० पेक्षा अधिक, तर १९ विद्यार्थ्यांनी ६०० गुणांचा टप्पा पार करून यशाचा सुवर्णअध्याय लिहिला आहे. यामध्ये सुहान शेख याने ६९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून, अथर्व गडदे ६५७, स्वयम बकाले ६५३, पूर्वा तेलसिंगे ६४४, निलभ कदम ६४१, मिसबा म्हाबरी ६३८ आणि श्रुती घाटगे हिने ६३७ गुणांसह उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासोबतच इतरही अनेक विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
NEET-2026 परीक्षा रद्द होऊन पुन्हा परीक्षा होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी मानसिक तणाव आणि अनिश्चिततेच्या छायेत होते. अशा कठीण काळात श्रद्धा इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. संस्थेने तातडीने विशेष टेस्ट सिरीज, दररोजचे डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स आणि प्रेरणादायी समुपदेशन राबवून विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ दिला नाही. याच सातत्यपूर्ण आणि वैज्ञानिक तयारीमुळे विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेत हे दैदीप्यमान यश मिळवले.
या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यशस्वी झालेले बहुतांश विद्यार्थी हे मध्यमवर्गीय, शेतकरी आणि कामगार कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींवर मात करत तांबे सरांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. या यशात संस्थेचे समन्वयक एम. एस. पाटील सर, सुप्रिया कौंदाडे, संगीता पवार, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे, राहुल खोत, बिप्लब पॉल, सत्यनारायणन आणि नागेंद्र यांचेही मोलाचे योगदान लाभले.
या यशाबद्दल बोलताना संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे सर म्हणाले की, "यश ही केवळ गुणांची संख्या नसून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शनाचा विजय आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतरही आमच्या टीमने दिवस-रात्र परिश्रम घेतले, ज्याचे हे फळ आहे. भविष्यातही देशाला उत्कृष्ट डॉक्टर घडविण्याचे आमचे ध्येय अधिक जोमाने सुरू राहील." या विक्रमी निकालामुळे श्रद्धा इन्स्टिट्यूटने पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन क्षेत्रातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा भक्कम केले आहे.




