पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ‘महाराष्ट्र फॉर्म्युला’? दोन उपमुख्यमंत्री, महिला नेत्यालाही संधी

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ‘महाराष्ट्र फॉर्म्युला’? दोन उपमुख्यमंत्री, महिला नेत्यालाही संधी

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, राज्यात भाजप दोन उपमुख्यमंत्री देण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, महिला सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून एका महिला नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निरीक्षक (पर्यवेक्षक) म्हणून कोलकात्यात पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप एका मुख्यमंत्र्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेऊ शकते.

बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे, असा संकेत देण्यासाठी एका महिला नेत्याला उपमुख्यमंत्री पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढील काही तासांत उपमुख्यमंत्री पदाचे चेहरे कोण असतील, याचे चित्र स्पष्ट होईल. बंगालमध्ये सर्वसमावेशक सरकार देण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यामध्ये महिला प्रतिनिधीत्वाला विशेष महत्त्व दिले जाणार असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यातील एक उपमुख्यमंत्री महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पर्यवेक्षक म्हणून कोलकत्यामध्ये दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांचं नाव आघाडी वरती आहे तर राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून दोघांना संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे, यामध्ये एका महिलेची निवड केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता राज्याच्या नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये काही प्रमुख नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. याशिवाय सिलीगुडी आणि उत्तर कोलकाता भागातील एखाद्या मोठ्या नेत्यालाही उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.