बारावीनंतर आता दहावीचा निकालाचा टक्का घसरला? नेमकं कारण काय

बारावीनंतर आता दहावीचा निकालाचा टक्का घसरला? नेमकं कारण काय

पुणे (प्रतिनिधी) : आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे, बोर्डाकडून दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार होता, मात्र एकाच वेळी साईटवरती वाढणार ट्रॅफिक यामुळे ११.३० वाजल्यापासून निकाल वेबसाईटवरती जाहीर करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाचे अपडेट्स दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे, तर मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारीही यंदा जास्त चांगली आहे.या वर्षी 92.9 टक्के निकाल लागला आहे. जेवढ्या मुली परिक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 94.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्याबाबत ती 89.56 टक्के आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या आहेत. यावेळी मुलींनी बाजी मारली आहे. दोघांमध्ये 5 टक्क्यांचा फरक हा पास होण्यामधला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष त्रिभुवन कुलकर्णी यांनी दिली आहे. तर बारावीप्रमाणेच आता दहावीच्या निकालाचा टक्का देखील घसरल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे.

बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. 

त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० वीचा निकाल विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे, १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल असं आधी बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं, मात्र, अचानक वेबसाईटवरती वाढणारे ट्रॅफिक यामुळे सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार असल्याचा बोर्डाचा महत्वाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.