FDA कर्मचाऱ्यांनी मंत्री झिरवाळांकडे तक्रार का केली? तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा

FDA कर्मचाऱ्यांनी मंत्री झिरवाळांकडे तक्रार का केली? तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्तपद तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरोधात जोरदार धडक कारवाया सुरू आहेत. या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असतानाच, दुसरीकडे एफडीएच्याच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केल्याची बातमी समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण देत मोठा खुलासा केला आहे.

कर्मचाऱ्यांनी तक्रार का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच कार्यालयीन वेळा ठेवाव्यात आणि सुट्ट्या मिळाव्यात, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री झिरवाळ यांच्याकडे गार्हाणे मांडले होते.

तुकाराम मुंढेंचा खुलासा

मंत्री झिरवाळांकडे झालेल्या तक्रारीबाबत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, “हो, ही तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळेतील (Laboratory) काही कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यांनी ही तक्रार मंत्री झिरवाळ यांच्याकडे सादर केली, ज्यानंतर ती तक्रार पुढील चौकशी व आढाव्यासाठी मंत्र्यांनी माझ्याकडे पाठवून दिली आहे.”

तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे आणि २४ तास ॲक्शन मोडवर असलेल्या कारवायांमुळे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली असून, त्यातूनच ही तक्रार झाल्याचे बोलले जात आहे.