एस. बी. फाउंडेशनचा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचा संकल्प
राधानगरी (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, मार्गदर्शक किसन चौगुले तसेच सामाजिक व शैक्षणिक युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 5000 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचा उपक्रम एस. बी.फाउंडेशनच्या वतीने राबवला जाणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सागर भावके यांनी दिली.

ते पुढे म्हणाले आपल्या घरात पडून असलेली जुनी पुस्तक, वापरात नसलेल्या वह्या, एक पेन किंवा नवीन शैक्षणिक साहित्य हे सर्व एखाद्या मुलासाठी अमूल्य ठरू शकत, कदाचित तुमच्यासाठी ती एक वही असेल पण त्या मुलासाठी ते संपूर्ण भविष्य असेल असे उद्गार संस्थापक अध्यक्ष सागर भावके यांनी काढले.
या उपक्रमअंतर्गत 1 मे ते 5 जून या कालावधीत शहीद विजेंद्र साबळे सार्वजनिक वाचनालय, तुरंबे ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी शैक्षणिक साहित्य जमा करावे असे सागर भावके यांनी आवाहन केले आहे.




