गगनबावडा तालुक्यातील शाळेमध्ये प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील नरवेली या शाळेमध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात आला. गगनबावडा तालुक्यातील विद्यामंदिर नरवेली , लखमापूर, गगनबावडा, वेसरफ, मांडुकली गावठाण, कोदे केंद्रीय प्राथमिक शाळा आसंडोली या शाळेमध्ये प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यामध्ये शिक्षक पालक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी शाळेमध्ये वेगळा उपक्रम घेण्यात आला.

यामध्ये विद्यार्थ्यांची नरवेली गावातून बैलगाडीतून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी लहान मुलांना कोल्हापुरी फेटे बांधून व बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांना पेन्सिल व पाटी वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, उत्तम पाटील, संदीप खेडेकर, राजू कोळेकर, अजित पाटील, समीर हरवले, संतोष कोकरे, आनंदा कोपरे, गणपत लाड, सीमा पुरस्कार उज्वला पाटील, सुनील कदम व सर्व शाळा स्थापन समितीचे सदस्य, सर्व विद्यार्थी आदी उपस्थित होते व शाळेचे मुख्याध्यापक रावडी सर, सहाय्य शिक्षक लिंगायत सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




