पक्ष-भेद बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीसाठी संपूर्ण सभागृह एकवटले : मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
एलईडी बल्बमुळे शहरातील अंधार दूर होणार ; आयुक्तांनी मानले डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे आभार
· कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर शहरामध्ये अतिक्रमण, रस्ते, स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न यांसारख्या अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि संपूर्ण सभागृह सकारात्मकतेने व सिस्टिमॅटिक पद्धतीने काम करत आहे. अशा परिस्थितीत शहराला अंधारातून बाहेर काढण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपने स्वतःच्या फंडातून १५५० एलईडी बल्ब मनपाला उपलब्ध करून दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, असे उद्गार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढले.

बल्ब हस्तांतरण कार्यक्रमात बोलताना आयुक्त म्हणाले, "आमदार सतेज (बंटी) पाटील, काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत १५५० एलईडी बल्ब पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. ही मनपासाठी अत्यंत मोलाची भेट आहे. येत्या १० दिवसांत शहरात ज्या-ज्या भागात दिव्यांची गरज आहे, त्या ठिकाणी सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेकडून या बल्बचे नियोजन व बसवण्याचे काम पूर्ण केले जाईल."
शहराच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण महापालिका सभागृह अत्यंत सकारात्मक पद्धतीने काम करत असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच शहराच्या हितासाठी पुढे येऊन १५५० बल्बची मदत केल्याबद्दल त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप व आमदार सतेज पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.




